भये प्रगट कृपाला !

- अयोध्येत भक्तीच्या उत्साहात श्रीरामनवमी साजरी

    30-Mar-2023
Total Views |

Ramnavami in Ayodhya 
 
 
नवी दिल्ली : श्रीरामजन्मभूमी अयोध्येत मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने श्रीरामजन्मोत्सव अर्थात श्रीरामनवमी साजरी करण्यात आली. यावेळी श्रीरामललांच्या विग्रहाभोवती मनमोहक अशी आरास करण्यात आली होती.
 
गुरुवारी दुपारी ठीक १२ वाजता श्री रामजन्मभूमीत भगवान रामाचा जन्म झाला. संपूर्ण मंदिर यावेळी रामनामाच्या जयघोषाने दुमदुमले. यावेळी रामललाला पितांबर, सोन्याचा मुकुट आणि हार घातलेला होता. तात्पुरत्या मंदिरातील ही शेवटची रामनवमी आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच २०१४ सालच्या श्रीरामनवमीपूर्वी अतिभव्य अशा मंदिरात श्रीरामलला विराजमान होणार आहेत.
 
यावेळी जन्मभूमी दरबारासह संपूर्ण मंदिर ५० क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते. सजावटीसाठी हिरवी पाने आसाम-ओडिशा येथून तर झेंडूची फुले कोलकाता येथून आणि ऑर्किड कॅनडातून आणण्यात आली होती. केवळ जन्मभूमीच नाही तर कनक भवन, श्री रामवल्लभकुंज मंदिर, लक्ष्मण किल्ला, हनुमंत निवास यासह सुमारे १० हजार मंदिरांमध्ये मंगलगीतांचा जयघोष करण्यात आला. यावेळी लाखो भाविक उपस्थित होते.
 
 
Ramnavami in Ayodhya