पंतप्रधानांची संसदेच्या नव्या वास्तूस भेट

30 Mar 2023 21:45:43
Prime Minister's visit to new building of Parliament

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा नवीन संसद भवनास भेट दिली. यावेळी तासाभराहून अधिक काळ त्यांनी विविध कामांची पाहणी केली. संसदेच्या दोन्ही सभागृहातील सुविधांचे त्यांनी निरीक्षण केले. पंतप्रधानांनी बांधकाम कामगारांशीही संवाद साधला. पंतप्रधानांसोबत यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते.


Prime Minister's visit to new building of Parliament 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबर २०२० रोजी नवी दिल्ली येथे नवीन संसद भवनाची पायाभरणी केली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेते, कॅबिनेट मंत्री आणि विविध देशांचे राजदूत उपस्थित होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी नवीन इमारत ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

नवीन संसदेचे क्षेत्रफळ ६४ हजार ५०० चौरस मीटर असेल. नव्या संसद भवनामध्ये लोकसभेमध्ये ८८८ तर राज्यसभेमध्ये ३२६ हून अधिक सदस्यांसाठी आसनव्यवस्था असणार आहे. त्याचप्रमाणे लोकसभेच्या सभागृहामध्ये एका वेळी एकुण १ हजार २२४ सदस्यांची बसण्याची व्यवस्था असेल. नव्या वास्तूचे बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड करत असून त्यासाठी ९७१ कोटी रूपये खर्च येणार आला आहे. नव्या संसदेसह सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा अहमदाबाद येथील एचपीसी डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट या कंपनीतर्फे तयार करण्यात आला आहे. संसदेची नवी वास्तू जुन्या वास्तूपेक्षा जवळपास १७ हजार वर्गमीटरने जास्त असणार आहे.





Powered By Sangraha 9.0