कुनो राष्ट्रीय उद्यानात आनंदवार्ता...

29 Mar 2023 19:44:21
baby cheetahs


मुंबई (प्रतिनिधी) :
मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात दक्षिण आफ्रिकेतील नामिबीयातुन आणलेल्या चित्त्यांपैकी एका चित्त्याने चार पिल्लांना जन्म दिला आहे. या बातमीमुळे कुनो राष्ट्रीय उद्यानात आनंदाचे वातावरण पसरले आहे. १७ सप्टेंबर २०२२ मध्ये चित्त्यांच्या पहिल्या तुकडीत आणलेल्या चित्त्याने चार पिल्लांना जन्म दिला आहे. जंगलात लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये चित्त्याची चार पिल्ले खेळताना कैद झाली आहेत.


दक्षिण आफ्रिकेतील नामिबियामधुन फेब्रुवारी महिन्यात १२ चित्ते आणले गेले होते. २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेवरुन सप्टेंबरमध्ये आठ चित्ते आणले गेले होते. जगातील पहिल्या आंतरखंडीय हस्तांतरणाचा भाग म्हणुन प्रोजेक्ट चित्ता ला अधिकृतरित्या मान्यता मिळाली होती. यापुर्वी याच चित्त्यांपैकी दोन चित्ते हे नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर २४ तासांच्या आतच या चित्त्यांनी पहिली शिकार केली होती. 'ओबान' आणि 'आशा' ही त्या चित्त्यांची नावे असुन यांच्या पहिल्या शिकारीच्या बातमीने आनंदाचे वातावरण होते.


काय आहे ’प्रोजेक्ट चित्ता ?

’प्रोजेक्ट चित्ता’ला अधिकृतपणे भारतातील चित्ता परिचयाची कृती योजना म्हणून ओळखले जाते. या प्रकल्पाचे उद्दिष्ट विलुप्त झालेल्या चित्त्याला परत नैसर्गिक अधिवासात परिचित करणे हे आहे. सर्वाधिक शिकार आणि अधिवास नष्ट झाल्यामुळे चित्ता भारतातून १९५२ मध्ये नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. गेल्या महिन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेने भारतात चित्ते पाठवण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. करारानुसार, १२ चित्त्यांची प्रारंभिक तुकडी दि. १८ फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात पाठवली गेली आहे. याच बरोबर पुढील आठ ते दहा वर्षांसाठी दरवर्षी आणखी १२ चे स्थलांतर करण्यात येणार आहे.



Powered By Sangraha 9.0