महेश काळेंनी स्वतःच हसं का करून घेतलं?

29 Mar 2023 19:12:58

mahesh kale 
 
मुंबई : तरुणाईला शास्त्रीय संगीताची ओळख करून देणाऱ्या तसेच परदेशात भारतीय शास्त्रीय संगीताचे वर्ग सुरू करून परदेशातील तरुणांना शास्त्रीय संगीताचे धडे देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे सोशल मिडियावर ट्रोल होत आहेत.
 
'रोजा जानेमन' गीत आणि त्यानंतर लगेच 'शब्दांच्या पलीकडले' हे गीत घेतल्याने महेश यांचावर काहींनी टीका केली आहे. तर काहींना त्याचा प्रयत्न आवडल्याने त्याचे कौतुक झाले आहे. 'रोजा जानेमन' या गाण्याला ए आर रहमान यांचं संगीत आहे. त्यावरून अनेक मिम्स बनवण्यात येत आहेत. एका मिम मध्ये ए आर रहमान यांचा फोटो लावून 'ओ महेश जी रमजान सुरु झालाय, रोजाची वाट लावू नका' अशा आशयाच्या मिम्स बनवल्या आहेत. तर त्यांच्या या व्हिडिओवर, 'दोन गाणी एकत्र का गेली, 'याची काय गरज होती' असं म्हणत नेटकऱ्यांनी महेश काळे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.
 
महेश काळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका कमेंट मध्ये ते म्हणतात, "आजच्या पिढीला शास्त्रीय गाण्याकडे वळवण्यासाठी त्यांच्या कलानं घ्यावं म्हणून मी फ्युजन करतो." यावरून लक्षात येते की, बदलत्या संगीत संस्कृतीचा स्वीकार करणार्यां महेश यांचा हा प्रयत्न आवड्लेलाआहे. तर, शुद्ध शास्त्रीय संगीतावर ज्यांचे प्रेम आहे त्यांनी महेश यांच्यावर सडकून टीका केली आहे. २ गीतांना एका रागाच्या अनुषंगाने एकत्र बसवण्याच्या नादात महेश यांनी गीतातील शब्दांच्या भावार्थाचा जराही विचार केला नसल्याचे मात्र यातून स्पष्ट होत आहे.
 
Powered By Sangraha 9.0