अनंत करमुसे प्रकरणात मोहित कंबोज यांचा धक्कादायक आरोप!

29 Mar 2023 14:15:19
 
Mohit kamboj
 
 
मुंबई : करमुसे प्रकरणात आधी आरोपी असणारा आणि आता माफीचा साक्षीदार बनायची तयारी दर्शवलेल्या वैभव कदम याने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली आहे. वैभव कदम हा माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्ग आव्हाड यांचा सुरक्षारक्षक होता. महत्त्वाचे म्हणजे करमुसे प्रकरणात कदम यांचीही आरोपी म्हणून चौकशी सुरु होती. दरम्यान, अनंत करमुसे प्रकरणात मोहित कंबोज यांनी धक्कादायक आरोप केला आहे. पोलिस कॅान्स्टेबल वैभव कदम याची हत्या झाल्याचा मोहित कंबोज यांचा आरोप आहे.
 
 
 
 
मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. हा एपिसोड आत्महत्येचा नसून खुनाचा आहे, असा दावा त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. कंबोज यांनी एक पोस्टही शेअर केली असून, ती वैभव कदम यांची शेवटची पोस्ट असल्याचं म्हटलं जात आहे.ज्यामध्ये लिहिले आहे की, "पोलिस आणि मीडियाला माझी एकच विनंती आहे की मी आरोपी नाही."
 
 

Mohit kamboj
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0