ठाण्यात ग्रीष्मोत्सवात विशेष मुलांच्या कलात्मक गुणांना मिळाला वाव

    28-Mar-2023
Total Views |
 
summer festival in Thane
 
 
ठाणे : विशेष मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी झटणार्‍या ठाण्यातील जागृती पालक संस्थेने आयोजित केलेला ‘ग्रीष्मोत्सव’ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणार्‍या या दोन दिवसी कार्यशाळेत टाय अ‍ॅण्ड डाय, मार्बल पेंटिंग, वॉल पेंटिंग, ओरिगामी, कागदी लगद्यापासून वस्तुनिर्मिती, माती काम, नाट्य व कला प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात आले. सर्वसामान्य मुलांप्रमाणे विशेष मुलांना उन्हाळी सुट्ट्यांमध्ये हक्काचा असलेला ग्रीष्मोत्सवसारखा समर कॅम्प अनुभवता आल्याने या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
 
ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ परबवाडी येथील स्व. दादा कोंडके एम्फी थिएटर येथे नुकतेच पार पडलेल्या या ग्रीष्मोत्सवात जिल्ह्यातील एम.बीए. फाऊंडेशन, चैतन्य, स्नेहालय, विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट, जिव्हाळा ट्रस्ट आणि धर्मवीर आनंद दिघे विशेष मुलांची जिद्द शाळा येथील मुलामुलींनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेत विविध कला शिकताना विशेष मुलांच्या चेहर्‍यावरही आनंद ओसंडून वाहात होता. या अनोख्या महोत्सवाला उद्योजक राजन राजे,भाजप प्रदेश उपाध्यक्षा अ‍ॅड. माधवी नाईक, एचडीएफसी बँक मॅनेजर शर्मिष्ठा नवले, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, भाजप पोखरण मंडळ अध्यक्ष संतोष जयस्वाल, जागृती पालक संस्थेचे अध्यक्ष सतीश धुरत, कार्यक्रमाच्या व्यवस्थापिका नॅन्सी सेठना आदी उपस्थित होते.
 
 
summer festival in Thane
 
 
स्वयंसेवकांचा गौरव
 
ग्रीष्मोत्सवाच्या समारोपासाठी मिती क्रिएशनच्या अध्यक्षा व सूत्रसंचालिका उत्तरा मोने, परिवार सह्याद्री संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बेर्डे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अ‍ॅड. संदीप लेले, अर्चना पाटील, प्लॅनेट फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन पंजाबी,सल्लागार श्रीकांत काळे, ज्येष्ठ छायाचिञकार प्रवीण देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यशाळेत उपस्थित विशेषज्ञ आणि स्वयंसेवकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.