नवी दिल्ली : कोरोनाचा विळखा आता पुन्हा एकदा वाढत आहे. नाटू नाटू गाण्याचे प्रसिद्ध संगीतकार एम.एम.किरवाणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत किरवाणी म्हणाले की, ‘प्रवास आणि उत्साहाचा परिणाम म्हणून मला आता कोविडचा त्रास होत आहे. मला कोविडची लागण झाली आहे. सध्या मी औषधोपचार घेत आहे. मला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
एम.एम.किरवाणी यांनी काही दिवसांपूर्वी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या नाटू नाटू या गाण्यानं बेस्ट ऑरिजनल साँग या कॅटेगिरीमधील पुरस्कार पटकावला. नाटू नाटू हे गाणं २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या आरआरआर या चित्रपटामधील आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, आता ऑस्कर जिंकल्यानंतर मला टॉप ऑफ द वर्ल्ड असल्यासारखे वाटत आहे.