30 मार्चला ‘सा. विवेक’च्या ‘हिंदुत्व’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा

    28-Mar-2023
Total Views |
Tomorrow Vivek's 'Hindutva' publication ceremony


मुंबई
: ‘सा. विवेक’तर्फे ‘हिंदुत्व’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा श्रीराम नवमीचे औचित्य साधून गुरुवार, दि. 30 मार्च रोजी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हिंदुत्वाचा आशय आणि हिंदुत्वाच्या विविध आयामांची आधुनिक परिप्रेक्ष्यात मांडणी करणारा ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या हस्ते सदर ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता, महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा आणि सामाजिक कार्यकर्ते इस्कॉन कृष्णचैतन्य दास सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ‘एबीएम नॉलेजवेअर लि.’चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश राणे व एस. एस. हायस्कूल, नवी मुंबईचे अध्यक्ष कमलेश पटेल यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्वांनी या कर्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन सा. ‘विवेक’तर्फे करण्यात आले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.