पाळीव प्राण्यांच्या खर्चाची बाजारपेठ तेजीत

28 Mar 2023 19:00:35
Annual cost of pets 64 thousand


मुंबई
: पाळीव प्राण्यांचे संगोपन करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून यासाठी ज्या कुटुंबाकडे पाळीव प्राणी असतात त्यांचा त्यासाठीचा वार्षिक खर्च सरासरी ६४ हजार रुपये इतके असल्याचे निदर्शनास आले आहे. तर पाळीव प्राण्यांचा बाजार जगभरात २०१९ च्या तुलनेत १३% वाढला असल्याची आकडेवारी तज्ज्ञांनी दिली आहे.

पाळीव प्राणी हाताळणे आणि त्यांचे संगोपन करण्याचे प्रमाण जगात सर्वत्र आहे. पाश्चिमात्य देशांतच नव्हे तर अन्य विकसनशील देशांतील कुटुंबांकडेही पाळीव प्राणी असतात. त्यासाठी लागणारे खाद्य, औषधे आणि विशेष कपडे यांची बाजारपेठ त्यामुळे तेजीत आली आहे. तसेच पाळीव प्राण्यांच्या डॉक्टरांची मागणीही वाढू लागली आहे.
 
जगभरात ज्या वेगाने पाळीव प्राणी बाळगण्याचे प्रमाण वाढत आहे, ते पाहता जितक्या वेगाने हा बाजार वाढत आहे, त्या हिशेबाने २०३० पर्यंत तो ४१ लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.सध्या प्रत्येक कुटुंब पाळीव प्राण्यांवर वर्षिक सरासरी ६४ हजार रुपये खर्च करत आहे. पाळीव प्राण्यांसोबतच त्यांच्या खेळणी व औषधांच्या बाजारातही तेजी आली आहे.
जगभरातील लोक आता पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेत आहेत. यामुळे प्राण्यांचे वय २० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. यात येत्या काळात आणखी वाढ अपेक्षित आहे.(जॅफ्रे सायमन्स, औषध कंपनी एलेंकोचे सीईओ)



Powered By Sangraha 9.0