करोना संसर्गाविषयी केंद्र – राज्य बैठक

27 Mar 2023 18:23:00
 
Meeting on Covid
 
 
नवी दिल्ली : देशातील करोना रूग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी राज्यांसोबत आढावा बैठक घेतली.
 
देशात सोमवारी सलग सहाव्या दिवशी एक हजाराहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सोमवारी सायंकाळी राज्यांचे आरोग्य सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यावेळी त्यांनी राज्ये – केंद्रशासित प्रदेशातील करोनाच्या वाढत्या रूग्णांचा आढावा घेतला आणि त्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या.
 
यावेळी राज्यांना येत्या १० आणि ११ एप्रिल रोजी घ्यावयाच्या मॉक ड्रिलविषयी निर्देश देण्यात आले. मॉकड्रिलमध्ये आयसीयू बेड, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन आणि मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित केली जाणार आहे. त्यासाठी देशभरातील रूग्णालये, प्रशासन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आयसीएमआरद्वारे राज्यांना करोना चाचण्यांमध्ये घट न करण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत.
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोमवारी करोनाटे १ हजार ८०५ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर १३४ दिवसांनंतर सक्रिय रुग्णांची संख्या १० हजाराच्या च्या पुढे गेली आहे. सलग सहाव्या दिवशी कोरोनाचे एक हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. दैनिक सकारात्मकता दर ३.१९ टक्के आहे, तर साप्ताहिक सकारात्मकता दर १.३९ टक्के आहे आणि रूग्ण बरे होण्याचा दर ९८.७९ टक्के आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0