बस्तरमध्ये परततेय शांतता आणि समृद्धी (भाग १)

27 Mar 2023 18:09:14
 
Anti Naxal Series First Story
 
 
नवी दिल्ली, पार्थ कपोले : उरल्यासुरल्या नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या छत्तीसगढमधील पोटकपल्ली येथील एका शाळेमध्ये गेल्या शनिवारी वेगळीच गडबड होती. निमित्त होते ते केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या भेटीचे. एकेकाळी नक्षलवाद्यांच्या दहशतीत राहणारे शाळकरी विद्यार्थी अगदी हसतखेळत देशाच्या गृहमंत्र्यांशी संवाद साधत होते.
 
केंद्रीय राखीव पोलिस दल अर्थात सीआरपीएफचा ८४ वा स्थापनादिन नुकताच म्हणजे २५ मार्च रोजी साजरा करण्यात आला. त्यासाठी छत्तीसगढमधील जगदलपूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह त्यासाठी उपस्थित होते. याच दौऱ्यात त्यांनी नक्षलवादाचा बालेकिल्ला असणाऱ्या पोटकपल्ली येथेही भेट दिली. येथे त्यांना ठराविक साच्यातील सरकारी दौरा न करता येथे असलेल्या एका शाळेमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. केवळ संवादच नव्हे तर विद्यार्थ्यांशी त्यांनी गप्पाही मारल्या. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशीदेखील संवाद साधला. अशाप्रकारे देशाचा गृहमंत्री आपल्याशी अगदी मोकळेपणाने गप्पा मारतो, याचा आनंद स्थानिकांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसत होता. एकेकाळी नक्षलवाद्यांच्या भितीत राहणारे येथील स्थानिक आज अतिशय निर्भयपणे जगत आहेत.
 

Anti Naxal Series First Story 
 
अशा निर्भय वातावरणाचे श्रेय जाते ते नक्षलवादाविरोधात कठोर कारवाई करणाऱ्या केंद्र सरकारच्या अतिशय सुयोग्य धोरणास. नक्षलवादाविरोधात यापूर्वीच्या सरकारांनीही कारवाई केली. मात्र, २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवादविरोधी निर्णायक लढ्यास प्रारंभ झाला आहे. त्याचप्रमाणे २०१९ साली अमित शाह यांनी गृह खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनीदेखील सीआरपीएफसह अन्य सुरक्षा यंत्रणांचा समन्वय साधून नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी अतिशय कणखर इच्छाशक्ती दाखविली आहे. सीआरपीएफने आंतरराज्य सीमांचा गैरफायदा घेण्यापासून नक्षलवाद्यांना रोखण्यासाठी विविध राज्यांच्या पोलिसांसह एक संयुक्त कार्यदल तयार केले आहे. बुढा पहाड, चक्रबंद आणि पारसनाथ हे तीन भाग ज्या ठिकाणी एकत्र येतात, त्या भागाला आज नक्षलवादापासून मुक्त करण्यात आले आहे आणि देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे.
 
 
हिंसक डाव्या विचारसरणीविरोधात निर्णायक लढा – अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या सुरक्षा दलांनी गेल्या 9 वर्षात डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादाविरोधात निर्णायक लढा दिला असून त्यांना मोठे यश मिळाले आहे. डाव्या विचारसरणीच्या कट्टरवाद्यांमुळे विकासाच्या मार्गात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यात सीआरपीएफ देखील यशस्वी झाले आहे. डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादाशी संबंधित हिंसाचाराच्या घटना 2010 मधील उच्चांकाच्या तुलनेत 76% ने कमी झाल्या आहेत आणि जीवितहानी देखील सुमारे 78%ने कमी झाली आहे.
 
नक्षलवादाचा खात्मा – तुलनात्मक आकडेवारी – ८ वर्षे ८ महिने
 
मे २०१४ ते डिसेंबर २०२२ – सप्टेंबर २००५ ते एप्रिल २०१४
 

Anti Naxal Series First Story 
Powered By Sangraha 9.0