अनिल जयसिंघानीला कोर्टाचा दणका! रवानगी कोठडीत!

27 Mar 2023 17:34:44
 
Anil Jaisinghani
 
 
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग आणि लाच दिल्याप्रकरणी न्यायालयाने सोमवारी बुकी अनिल जयसिंघानी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गेल्या आठवड्यात त्याला त्याचा चुलत भाऊ निर्मल जयसिंघानीसह गुजरातमधून अटक करण्यात आली होती. सोमवारी रिमांड संपल्यानंतर दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.डी.अलमले यांच्यासमोर हजर करण्यात आले. विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी या दोघांच्या कोठडीत आणखी पाच दिवस वाढ करण्याची मागणी केली, मात्र न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
 
या प्रकरणात अनिल जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानीही आरोपी आहे. ती ही न्यायालयीन कोठडीत होती. मात्र, आता तिला जामीन मंजूर केला आहे. अनिक्षा जयसिंघानी हिला मुंबई सत्रन्यायालयाने ५०हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर करण्यात आला आहे. तपासात सहकार्य करण्याच्या अटी ही बजावल्या आहेत.
 
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी पिता-मुलीच्या दोघांविरुद्ध कट रचणे आणि खंडणी वसूल करणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल जयसिंघानी याच्यावर १७ खटले प्रलंबित आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0