नवी दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची पंजाबच्या मानसा जिल्ह्यात २९ मे रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. हल्लेखोरांचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुसेवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेला अनेक दिवस झाले असले तरी या प्रकरणाचा शोध लागलेला नाही. मात्र सिद्धू मुसेवालानंतर आता त्याच्या घरचे हे सुरक्षित नाहीत. त्याचे वडिल बलकौर सिंग यांना वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
यापूर्वी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पंजाब पोलिसांनी बलकौर सिंगला ईमेलद्वारे धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली होती. आरोपी महिपाल राजस्थानमधील जोधपूरचा असून त्याला दिल्लीतील बहादूरगड येथून अटक करण्यात आली आहे.आता पुन्हा एकदा धमक्या आल्या आहेत. त्याला राजस्थानमधून ईमेल पाठवून धमकी देण्यात आली आहे . धमकी मिळाल्यानंतर मानसा पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.