नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर २४ मार्च रोजी लोकसभा अध्यक्षांनी लोकसभा सदस्यत्व रद्दची कारवाई केली होती. मात्र या कारवाईनंतर जर राहुल गांधी ना ८ वर्ष निवडणूकबंदी झाली तर काय होईल?
जर या संपूर्ण प्रकरणातून राहुल गांधी दोषमुक्त झाले नाहीत तर त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढविता येणार नाही. असे झाल्यास येत्या जूनमध्ये ५२ वर्षे पूर्ण करणारे राहुल गांधी आठ वर्षांनी म्हणजे २०३१ सालीच निवडणूक लढवू शकतील. म्हणजेच राहुल गांधी यांची शिक्षा कायम राहिल्यास ते केवळ २०२४ नव्हे, तर २०२९ सालीही लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाही. त्याचवेळी २०३१ साली त्यांचे वय साधारणपणे ६२ वर्षांचे असेल. त्यामुळे राहुल गांधींच्या राजकीय कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.