चोराला चोर म्हणणं गुन्हा ठरला; उध्दव ठाकरे

24 Mar 2023 17:11:32
 
uddhav thackeray on Rahul Gandhi
 
 
मुंबई : मोदी आडनावारून केलेल्या बेताल वक्तव्यामुळे राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. यावरुन अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना, उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "चोराला चोर म्हणणं गुन्हा ठरला." असे म्हणत त्यांनी निषेध व्यक्त केला.
 
ते म्हणाले, "राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला आहे. चोर, देश लुटणारे आजही मोकळे आहेत व राहुल यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकुमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. आम्ही लढत राहू.”
 
 
 
 
 
संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया ट्वीट करत मोदी सरकारवर टीकास्र सोडलं होतं. दरम्यान, यावरून केशव उपाध्ये यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, यावरून भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
 
 
 
 
 
केशव उपाध्ये म्हणाले, "चोराला चोर म्हणणं गुन्हा ठरला आहे, या वाक्याचा अर्थ ओबीसी समाजाला आपणही चोर समजता का? राहुल गांधी यांच्या विधानाचं समर्थन करताना आपण ओबीसी समाजाचा अपमान करत आहात." असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0