मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी समाजाविरोधात केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच भोवले आहे. त्यांचे संसदीय सदस्यत्व रद्द करण्यात आले. यामुळे लोकसभाध्यक्षांच्या निर्णयावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेतून सभात्याग केला. याचे पडसाद सर्वत्र उमटत असताना, राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे गुजरातमधील नेते पूर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती.
कोण आहेत पूर्णेश मोदी?
भाजपचे गुजरातमधील नेते पूर्णेश मोदी हे तेली समाजाचे बडे नेते अशी त्यांची ओळख आहे. गेले ३० वर्षे ते राजकारणात सक्रिय आहेत. सुरवातीला ते सुरत शहराचे महापौर होते. त्यानंतर सुरत पश्चिम मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडुन आले. गेल्या सरकारमध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणुन काम पाहिल आहे.
२०१९ मध्ये, राहुल गांधींविरोधात पूर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती. ती याचिका कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्याविरोधात होती. या याचिकेची काल सुनावणी सुरु असताना त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. आणि ही शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने संसदीय सदस्यत्व रद्द करुन मोठी कारवाई केली आहे.