२०२४ पूर्वी समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करा : बाबा रामदेव

    23-Mar-2023
Total Views |
uniform-civil-code-should-be-implemented-before-2024-population-control-law-should-also-be-made-baba-ramdev-appeal-to-modi-government


लखनऊ
: योगगुरू बाबा रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारकडं देशात समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. सरकारनं या दिशेनं लवकरात लवकर प्रभावी पावलं उचलावीत आणि २०२४ पूर्वी हा कायदा लागू करावा, असंही ते म्हणाले आहेत.

भव्य संन्यास दीक्षा कार्यक्रमाच्या उद्धाटन प्रसंगी राम मंदिराचे उद्घाटन पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणार असून जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० ही हटवण्यात आले आहे. मात्र, दोन मोठी कामे होणे बाकी आहेत. पहिले काम समान नागरी संहिता लागू करणे आणि दुसरे काम म्हणजे लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करणे. ही दोन्ही कामे पुढील वर्ष २०२४ पर्यंत पूर्ण व्हायला हवीत.