केंद्रीयराज्यमंत्री ना.रामदास आठवले उद्या दोन दिवसांच्या जम्मु दौ-यावर

    23-Mar-2023
Total Views |
 
ramdas athavle
 
मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे उद्या शुक्रवार दि. २४ मार्च रोजी जम्मु येथे दोन दिवसांच्या दौ-यावर रवाना होणार आहेत.
 
 जम्मु काश्मीर राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचा तसेच कोरोना महामारीच्या काळात जनतेची मदत करणा-या कोरोना योद्ध्यांचा सत्कार केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जम्मु येथे अनुथम हॉटेलमधील सभागृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जम्मू मधील सामाजिक कार्यकर्त्या संध्या गुप्ता यांनी कोरोना योद्धा अवॉर्ड आणि सत्कार समारंभाचे अयोजन केलेले आहे.
 
ना.रामदास आठवले हे जम्मु दौ-यात केंद्र सरकारच्या सामाजिक न्यायमंत्रालयाच्या विविध योजनांचा आढावा घेणार आहेत. जम्मु येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यास ना. रामदास आठवले संबोधित करणार आहेत.