'चौक'ची तारीख जाहीर, '१२ मे'ला होणार प्रदर्शित

    23-Mar-2023
Total Views |
chauk 
 
मुंबई : हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड थिएटरच्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटाची बॉक्स ऑफिस गुढी उभारण्यात आली. याप्रसंगी मराठी चित्रपटासंबंधित सर्व मान्यवर आणि कलाकार उपस्थित होते. यावेळी दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांचा आगामी मराठी चित्रपट ‘चौक’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. १२ मे २०२३ रोजी चौक प्रदर्शित होईल.
 
‘चौक’च्या निमित्ताने देवेंद्र गायकवाड दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. महाराष्ट्रातल्या चौका-चौकाची गोष्ट ते आपल्यासमोर घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले होते, ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ केला. आता या चित्रपटाची तारीख घोषित झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक उंचावली आहे.
 
'मराठी चित्रपटाची बॉक्स ऑफिस गुढी' या सोहळ्याला रमेश परदेशी, स्नेहल तरडे, सुनिल अभ्यंकर, संस्कृती बालगुडे, किरण गायकवाड, चौक चित्रपटाचे निर्माते दिलीप लालासाहेब पाटील तसेच शुभंकर एकबोटे, अक्षय टंकसाळे, नितीन सुपेकर, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सुनील महाजन, सिटीप्राईड ग्रुपचे अध्यक्ष अरविंद चाफळकर, भाजप चित्रपट आघाडीचे अजय नाईक, आर.पी.आय (ए) चे ऍड. मंदार जोशी उपस्थित होते, लिड मीडियाचे विनोद सातव यांनी सूत्रसंचालन केले.
 
‘चौक’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांचे असून या चित्रपटाच्या निमित्ताने ते दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. यापूर्वी त्यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती. यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.