लव्ह जिहादवरून मंगलप्रभात लोढांनी आझमींना झापले !

23 Mar 2023 22:05:47
Mangal Prabhat Lodha on Love Jihad


मुंबई:
राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्रातील लव्ह जिहाद प्रकरणांची आकडेवारी दिल्यानंतर राष्ट्रवादी कोन्ग्रेस आणि समाजवादी पक्षाकडून त्यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येत होती. गुरुवारी लोढा यांच्या घरावर मोर्चा काढण्याचाही अपयशी प्रयत्न समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. विधिमंडळ अधिवेशनात याच विषयावरून मंत्री लोढा यांनी अबू आझमींची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे दृश्य पाहायला मिळाले. लोढांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आझमींची बोलती बंद झाल्याचे दिसून आले.


विधिमंडळ अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याच्या कामकाजात गुरुवारी २९३ अन्वये विधानसभेत विविध विषयांच्या विषय आणि प्रस्तावावर चर्चा सुरु होती. त्यावेळी महिला आणि बालविकास विभागाच्या विषयांवर सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर लोढा यांनी सविस्तर उत्तरे दिली. आपल्या उत्तराचा समारोप करताना त्यांनी अबू आझामिंकडून लव्ह जिहादच्या संदर्भात करण्यात आलेल्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिले.


आझमींना झापताना लोढा म्हणाले की, ‘’ आमदार अबू आझमी यांनी एका महिला आमदाराने दिलेल्या माहितीवर बोलताना चुकीच्या शब्दाचा वापर केला होता त्यावर मला आक्षेप आहे. एका महिला आमदाराने महाराष्ट्रात मागील काही वर्षांमध्ये घडलेल्या लव्ह जिहादच्या एक लाख पंचवीस हजार पिडीत महिला मुलींची आकडेवारी सभागृहात नमूद केली होती. संबंधी महिला आमदाराने दिलेली आकडेवारी पूर्णपणे योग्य असून ही घडलेल्या घटनांचीच आकडेवारी आहे. लव्ह जिहादच्या घडलेल्या घटनांपैकी ९० टक्के घटनांची पोलिसांत नोंदच होत नाही हा इतिहास आहे. त्यामुळे लव्ह जिहादमध्ये पिडीत असलेल्या आणि त्यामुळे त्रास सहन करणाऱ्यांविषयी अबू आझमी यांनी केलेले विधान आपण विधिमंडळाच्या रेकॉर्डवरून काढून टाकावे,’’ अशी मागणी मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभा अध्यक्षांकडे यावेळी केली.
 
 
यावेळी आपल्या भाषणात व्यत्यय आणणाऱ्या आझमींची लोढांनी कठोर शब्दांत कानउघडणी केल्याचे चित्र सभागृहाला पाहायला मिळाले. सौम्य आणि मृदू स्वभावाच्या मंगलप्रभात लोढा यांचा आक्रमक अवतार बघून विरोधी बाकावरील सदस्यांनी आझमींच्या समर्थनार्थ चकार शब्द काढण्याचे धारिष्ट्य दाखविले नाही.

 
समाजवादीच्या कार्यकर्त्यांची चर्चगेटला निदर्शने

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सरकारी बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा मनसुबा आखणाऱ्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावण्यासाठी स्वतः भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा आणि भाजपची दिग्गज नेतेमंडळी आक्रमकपणे तयारी करून वात बघत होती. मात्र, कायदा सुव्यावास्थेटची स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सपाच्या कार्यकर्त्यांना मंत्रालयाच्या नजीकच्या चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ पोलिसांकडून थांबविण्यात आले. त्यामुळे भाजप आणि सपाच्या कार्यकर्त्यांमध्ये होऊ घातलेला संभाव्य संघर्ष टळला.
अन्यथा आम्ही बेहरामपाड्यात येऊन वाजवून दाखवू !
जर समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आमच्या नेत्यांच्या घरावर चालून येत असतील तर आम्ही आज आणि उद्याही तयार आहोत. आम्ही त्यांच्या मोर्चाला लोकशाही मार्गाने उत्तर द्यायला सक्षम आहोत. लव्ह जीहादावर टिप्पणी केल्यामुळे आझमीला का झोंबले हा खरा सवाल आहे. जर त्यांना झोंबले असेल तर मी त्यांना एक वर्षाचे बर्नोल द्यायला तयार आहे. आझमी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी एक तास फक्त पोलीस संरक्षण बाजूला करावे मग कोण कुणाची सफाई करतो ते कळेल. अशा प्रवृतींना आज थांबवले नाही तर उद्या सगळेच सुरु होतील. जर आझमी आणि त्यांच्या समर्थकांणा आमच्या समोर यायचे नसेल तर आम्ही बेहरमपाडा आणि मोहमद अली रोडला येऊन तुम्हाला वाजवून जाऊ हे त्यांनी लक्षात ठेवावे.’’ नितेश राणे, भाजप आमदार


Powered By Sangraha 9.0