लव्ह जिहाद वर चर्चा! उबाठा गटाचा पाठिंबा की विरोध?

23 Mar 2023 16:11:14
 
Love Jihad
 
 
मुंबई : लव्ह जिहादची अनेक प्रकरणे राज्यात सक्रीय असताना आज अधिवेशनात डॉ. मनीषा कायंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी अनेक प्रकरणांचे दाखले दिले. त्या म्हणाल्या, "लव्ह जिहादला मुली बळी पडु नये यासाठी आपल्या अनेक संस्था कार्यरत आहेत. या प्रकरणात मुले जो काही खर्च त्या मुलीसाठी करतात, तो खर्च बाहेरुन येत असतो. फक्त मुलीच नाही, तर स्त्रियादेखील या लव्ह जिहादचा बळी पडतात." यावेळी बोलताना त्यांनी कोल्हापुरमधील एका प्रकरणाचा दाखला दिला.
 
यावर उध्दव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "लव्ह जिहाद, धर्मांतरण, लहान मुलींनी पळवुन नेणे अशा प्रकरणांमध्ये जेव्हा पालक पोलिसांकडे जातात, तेव्हा पहिले २४ तास तर पोलिस काहीच कारवाई करत नाहीत. यामुळे कारवाई ही वेळेतच झाली पाहिजे. य़ासंबंधी कठोर कायदा ही झाला पाहिजे. सर्कयुलर आहे पण ते पोलिस मानत नाहीत. यामुळे लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा झाला पाहिजे." असं अनिल परब म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0