वैवाहिक अत्याचार प्रकरणी ९ मे रोजी ‘सर्वोच्च' सुनावणी

23 Mar 2023 18:45:10
Hearing on May 9 in the case of marital abuse
 
नवी दिल्ली : वैवाहिक अत्याचाराला गुन्हा घोषित करण्याची विनंती करणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ९ मे रोजी सुनावणी होणार आहे. वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. वकील जयसिंह पीठाला म्हणाल्या, प्रकरणातील युक्तिवाद व विविध पैलूंच्या विश्लेषणासाठी आदेश तयार आहेत. त्यानुसार सुनावणी होणार आहे.


Powered By Sangraha 9.0