‘एनएसटीआय’, मुंबईचे षष्ठीपूर्तनिमित्त कार्यक्रम उत्साहात

21 Mar 2023 17:56:27
National Skill Training Institute


मुंबई
: ‘नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ (एनएसटीआय), मुंबई ही भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या कक्षेत प्रशिक्षण महासंचालनायाद्वारे (डीजीटी) चालवल्या जाणार्‍या संस्थेने सोमवार, दि, 20 मार्च रोजी 60 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘एनएसटीआय’च्या उपक्रमांचा तसेच, कामगिरींवर प्रकाश टाकण्यात आला. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक डॉ. संतोष कुमार मल्लिक हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 यावेळी केतन पटेल (संचालक (ख/ल), ठऊडऊए महाराष्ट्र), पी. एन. जुमाळे, (संचालक- शिकाऊ प्रशिक्षणार्थी मंडळ, मुंबई), कुशवाह, (प्रिन्सिपल, डिफरंटली एबल्डसाठी राष्ट्रीय करिअर सेवा), दिलशाद खान (ज्येष्ठ पत्रकार), डॉ. सुंदरी ठाकूर (नारी सन्मान संघटनेच्या संस्थापक आणि अध्यक्षा), उज्वला विश्वकर्मा (संस्थापक-भारतीय जनहित सेवा समिती), डॉ. नरेशकुमार चौहान (प्रिन्सिपल, एनएसटीआय, मुंबई) आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात ‘एनएसटीआय’, मुंबईच्या निवृत्त माजी कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने या एनएसटीआय, मुंबईच्या प्रशिक्षणार्थींनी सांस्कृतिक कार्यक्रम, पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला होता. कार्यक्रमाची सांगता तेजस पाटील (सहाय्यक निदेशक) यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
Powered By Sangraha 9.0