विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचा वर्धापनदिन आणि नवनिर्वाचित कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा

21 Mar 2023 10:24:52
 
मुंबई : चिंचपोकळी येथील विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचा ६९ वा वर्धापनदिन, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि नवनिर्वाचित कार्यकारिणीचा शपथविधी सोहळ्याचे आयोजन २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता चिंचपोकळी येथील उत्कर्ष केंद येथे करण्यात आले आहे.


 या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी मंडळप्रमुख विनायक चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या वेळी मंडळ प्रमुख सचिन हराळे आणि अर्थप्रमुख निलेश घोडेकर आपला वार्षिक अहवाल सादर करणार आहेत. या प्रसंगी सन २०२३-२४  चे नवनिर्वाचित मंडळ प्रमुख सागर बोने, उपमंडळ प्रमुख स्वप्निल हराळे आणि सहमंडळ प्रमुख शार्दुल केळंबेकर यांच्या सहित नवीन कार्यकारिणीला कार्यक्रम अध्यक्ष शपथ देणार आहेत. या कार्यक्रमाला मंडळाचे माजी पदाधिकारी तसेच सभासद यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळ प्रमुख सचिन हराळे यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0