भाजपाच्या महिला मेळाव्यात रॅम्प वॉक करीत महिलांनी जिंकली प्रेक्षकांची मने

21 Mar 2023 19:20:20
 
 
 
bjp mahila melva
 
 
 

डोंबिवली 

भाजपाच्या माजी नगरसेविका शिल्पा शिवाजी शेलार आणि माजी नगरसेवक साई शिवाजी शेलार यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात महिलांनी रॅम्प वॉक करीत प्रेक्षकांची मने जिंकली.
 

स्वर्गीय शिवाजी दादा शेलार क्रीडांगण खंबाळपाडा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. यावेळी भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, स्वरा शेलार, सिध्दार्थ शेलार,वैशाली जेम्स, राजू शेख, अंजली गांगल, उषा पाटील, रंजना शेलार, कावेरी बोराडे, गीता पाटणकर,श्रध्दा जोशी, कल्पना राजपूत, सुवर्णा काटे ,अनिता कदम,सुषमा लेंढे, विनायक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
 

या मेळाव्यात महिलांसाठी वेशभूषा, पाककला स्पर्धा, प्रश्नमंजुषाचे आयोजन केले होते. विविध प्रकारचे खेळ खेळून महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे खास आकर्षण लकी ड्रॉ पैठणी होती. महिलांनी केलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये पोलिस, पाककला स्पर्धेतील विजेत्या आणि क्रिकेट खेळात विजेत्या ठरलेल्या महिलांचा समावेश होता. अंजली गांगल यांनी सिंधुताई सपकाळ यावर सादरीकरण तर आदर्श पार्क यांनी फ्यूजन नृत्य सादर केले. या कार्यक्रमासाठी चामुंडा गार्डन महिला मंडळाचे सहकार्य लाभले आहे.
 

चौकट- महिला क्रिकेट संघाचा सन्मान
बालाजी अंगण, चामूंडा गार्डन, सवरेदय स्वरूप, अंबर इन्क्लेव्ह, अन्नपूर्ण आशिष संघ मिक्स, सवरेदय त्रिलोक, त्रिलोक हाईट्स, शंखेश्वर हाईट्स, लक्ष्मी पार्क या संघाचा गौरव करण्यात आला. उत्कृष्टू खेळाडू जयश्री गुडेकर, प्रियंका शिंदे, नयन हांडे, कृतीका जोशी, मॅन ऑफ द मॅच सोनाली उकर्डे, जयश्री गुडेकर, प्रियंका शिंदे ,मॅन ऑफ द सिरीज अनुप्रिया मळेकर यांना सन्मानित करण्यात आले.
 

चौकट- पाककला स्पर्धेत पुरणपोळी अव्वल
पाककला स्पर्धेत पुरणपोळी अव्वल ठरली आहे. रेश्मा पारके आणि वैशाली सोनावणे यांनी पुरणपोळी तयार केली होती. तसेच मिश्र पिठाची थालीपीठ आणि चटणी, मासवडी, लेयर्सची करंजी, मखमल पुरी, मोहनथाळ, रवा लापसी, अप्पे व चटणी, पनीर अफगाणी असे विविध प्रकार पाककला स्पर्धेसाठी स्पर्धकांनी तयार केले होते.
 
 
------------------------------------------------------------
Powered By Sangraha 9.0