हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची रौप्य महोत्सवी वाटचाल

हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची रौप्य महोत्सवी वाटचाल

    21-Mar-2023
Total Views |
हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची रौप्य महोत्सवी वाटचाल
 
 
 
swagat yatra photo
 
 
 
जान्हवी मोर्ये
डोंबिवली:
हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गुढीपाडव्याला हिंदू नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येऊ लागली. ही स्वागतयात्रा आता पंचविशीत येऊन पोहोचली आहे. मागे वळून पाहताना या स्वागतयात्रेने पंचवीस वर्षात काय दिले यांचा विचार केला तर हिंदू धर्म रक्षणाबरोबरच आपली संस्कृती आणि परंपरा पुढील पिढीत नेण्याचे काम केले आहे हेच उत्तर मिळते. काळाच्या ओघात हिंदू नववर्षाचे स्वागत करताना काही बदल झाले असले तरी आज ही तरूणाई मोठ्या संख्येने गणेश मंदिर परिसरात जमते.
 
डोंबिवली पूर्व ला 1998 मध्ये मदन ठाकरे चौकात 31 डिसेंबर साजरा करण्यात आला. हा सर्व प्रकार डोंबिवलीकर प्रेमी आणि सामाजिक जाण असलेल्यांनी पाहिला. ही घटना ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, मधुकर चक्रदेव आणि सुरेंद्र वाजपेयी यांच्यार्पयत पोहोचली. 31 डिसेंबर सेलिब्रेशन या पाश्चिमात्य संस्कृतीचे प्रस्थ वाढत जाईल अशी भिती त्यावेळी व्यक्त झाली. त्यानंतर दत्तनगरमध्ये एक बैठक झाली. पाश्चिमात्य संस्कृतीला विरोध न करता एखादा चांगला पर्याय द्यावा या उदात्त हेतूने हिंदू नववर्षाची स्वागतयात्रा ही संकल्पना सुरू करण्याचा विचार मांडण्यात आला. श्री गणेश मंदिर संस्थानाने गुढीपाडव्याचे औचित्य साधत नववर्षानिमित्त लोकसहभागातून स्वागतयात्रेची संकल्पना उदयास आली. केवळ मिरवणूक काढून नववर्षाचे स्वागत न करता त्यातून संस्कृतीचे जतन करणे तसेच विविध उपक्रम आणि सामाजिक संदेशाद्वारे बांधिलकी जपली आहे. आबासाहेब पटवारी हे तेव्हा श्री गणेश मंदिर संस्थानाचे अध्यक्ष होते. आबासाहेबांच्या संकल्पनेतूनच नववर्ष स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. आणि हळूहळू ही स्वागतयात्रा सर्वच शहरात पोहोचली. डोंबिवलीतून सुरू झालेली ही स्वागतयात्रा आता सातासमुद्रापार ही पोहोचली आहे. स्वागतयात्रेत राजकीय किंवा कोणताही ज्ञातीभावना येऊ नये याकडे ही लक्ष दिले गेले होते.
 
 
नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी झालेले प्रकाश माने म्हणाले, हिंदू नववर्षाच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र येत आहोत. आजच्या पिढीला आपण सण का साजरे करतो हे माहित आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.सणाचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व पुढच्या पिढीला कळावे हा या नववर्ष यात्रेमागील प्रमुख उद्देश आहे. नववर्षाचे स्वागत करण्याचा निर्णय झाले तेव्हा मी आणि माझी पत्नी अशी 22 दाम्प्त्य एकत्र आली होती. घरातून एक ताट आणि चमचा आणला होता. ते वाजवून आम्ही ‘नववर्षा तुझे स्वागत’ असे म्हणत नववर्षाचे स्वागत केले. दुकानादारांकडून रांगोळी घेऊन परिसरात रांगोळ्य़ा घातल्या. दुस:या वर्षापासून नागरिक देखील यात सहभागी होऊ लागले. दोन वर्षानंतर कल्याणमध्ये देखील नववर्ष स्वागतयात्रेचा विचार सुरू झाला.
 
नागरिक वैभव राणे म्हणाले, हिंदू नववर्ष स्वागतयात्रेची परंपरा सातत्याने 25 वर्ष सुरू ठेवणे ही साधी गोष्ट नाही. संस्कृतीचे दर्शन या स्वागतयात्रेतून घडते. नववर्षांची स्वागतयात्रेतून नवीन पिढीला जुन्या संस्कृतीचे दर्शन दिले. परंपरा जपण्याचे मार्ग दिला. दिवाळीत किल्ले आम्ही बांधत होतो पण आता ती क्रेझ कमी झाली आहे. या स्वागतयात्रेने संस्कृतीचे जतन करणे ही शिकवण दिली आहे.
 
श्री गणेश मंदिर संस्थान कार्यवाह प्रविण दुधे म्हणाले, नववर्ष स्वागतयात्रा पुढील दोन ते तीन वर्षातच गावकीचा उत्सव झाली. ही स्वागतयात्रा सर्वानीच आवडली त्यामुळे तिचे अनुकरण देश विदेशात ही होऊ लागले. या स्वागतयात्रेच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊ लागले. विविधतेने नटलेले देश असताना त्यांचे एक शहरातील रूप पाहायला मिळाले. अनेक संस्था एकत्र आल्या. त्यांची कार्य समजले. विचारांची संस्कृतीची आदान प्रदान झाले. चांगले उपक्रम झाले. लोकशक्तीच्या माध्यमातून काही सामाजिक बांधिलकीचे उपक्रम सुरू के ले. ढोलपथक, झांज ही पारंपारिक वाद्य वाजवित आहोत. पारंपारिक वाद्यांचा ठेवा सुध्दा जपला गेला आहे. सामाजिक संदेश देण्याबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम ही या माध्यमातून राबिवले गेले.
 
 
---------------------------------------------------
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.