चिपळुणमध्ये खवले मांजरास वनविभागाकडुन जीवदान

20 Mar 2023 19:40:58


pangolin rescue
मुंबई (प्रतिनिधी): चिपळुण शहराजवळ असलेल्या धामणवणे गावातील शेततळ्यात शनिवारी खवले मांजर पडलेले आढळुन आले होते. हे लक्षात येताच शेततळ्यात खवले मांजर पडल्याची माहिती राम रेडीज यांनी वन विभागाला दिली. तात्काळ वन विभागाच्या बचाव पथकाने घटनास्थळी जाऊन खवले मांजरास बाहेर काढले.


20 March, 2023 | 19:43


या खवले मांजराची वन विभागाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडुन तपासणी करुन ते सुरक्षित असल्याची खात्री केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. खवले मांजराचा बचाव करण्याच्या या मोहिमेत चिपळुणचे आरएफओ दिपक खाडे, सहाय्यक वन संरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.


Powered By Sangraha 9.0