पुण्यातील रहिवाशी भागात वावरणारा बिबट्या जेरबंद

20 Mar 2023 15:21:35



leopard rescue

मुंबई (प्रतिनिधी): पुण्यातील वारजे माळवाडी येथील रहिवाशी परिसरातून सोमवारी सकाळी एका नर बिबट्याला ताब्यात घेण्यात आले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग, आरईएसक्यू चॅरिटेबल ट्रस्ट टीम आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोहीम राबविण्यात आली. 'रेस्क्यू सी टी' टीममधील डॉ. सुश्रुत शिरभाटे यांनी या प्राण्याला 'डार्ट'ने बेशुद्ध केले. यानंतर वन विभागाच्या आरईएसक्यू टीमने त्याला पकडले आणि शहर पोलिसांनी परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत केली.



leopard rescue
हा बिबट्या सकाळी रहिवाशी परिसरात वावरताना आढळून आला होता. या बिबट्याने कोणावरही हल्ला केला नाही. या बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. बघ्यांची गर्दी आणि गोंधळ झाल्यामुळे घाबरून हा बिबट्या पत्र्याच्या शेडमध्ये लपून बसला होता. शेडमधील बांबूच्या ढिगाऱ्या आड लपून बसला होता. सकाळी साडेआठच्या सुमारास या प्राण्याला पकडण्यात आले. हा बिबट्या एनडीए परिसरातील जंगलातून आला असण्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे. या बिबट्याने कोवरही हल्ला केल्याची नोंद नाही, यामुळे या बिबट्याला योग्य उपचारानंतर नैसर्गिक अधिवावसात सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु, जंगल परीसारतील मानवी अतिक्रमणाचे पडसाद म्हणून या घटनेकडे बघितले जात आहे.



Powered By Sangraha 9.0