शैक्षणिक कर्ज घेतायं? या गोष्टी लक्षात ठेवा!

    20-Mar-2023
Total Views |
 

प्रत्येक व्यक्तीला चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळाले पाहिजे कारण ते यशस्वी करिअर घडविताना तज्ञ ज्ञान आणि महत्त्वपूर्ण कौशल्ये आपल्याला देते. राष्ट्राची निर्मिती करताना मूलभूत अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी शिक्षण हे तरुणांना सक्षम करते आणि प्रभावित करते. सरकारने शैक्षणिक क्षेत्राची क्षमता ओळखली आहे आणि म्हणूनच केंद्रीय अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत शिक्षण क्षेत्रासाठीच्या निधी वाटपात 8.2% ने वाढ केली आहे.

मात्र, शैक्षणिक महागाई आणि रुपयाचे अवमूल्यन या सारखी घटके आर्थिक अडथळा निर्माण करतात. त्यामुळे अनेक भारतीय विद्यार्थी शैक्षणिक कर्ज (एज्युकेशन लोन) घेणे अधिक पसंत करतात जेणेकरून त्यांना पालकांवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे उच्च शिक्षणासाठी अर्थसाहाय्य मिळवून त्यांच्या शैक्षणिक आकांक्षा त्यांना उत्साहाने गाठता येतील. मात्र, विद्यार्थी वर्गात शिक्षण कर्जाशी संबंधित अनेक गैरसमजांमुळे संभ्रम निर्माण होतो. विद्यार्थी सहसा प्रथमच कर्ज घेणारे असल्याने, शैक्षणिक कर्ज अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता यावे म्हणून या विषयात खोलवर जाणे गरजेचे बनले आहे.

एका वेळी एक मिथ्य खोडून काढणे:

1. शैक्षणिक कर्ज (एज्युकेशन लोन) घेण्यापेक्षा मालमत्ता विकून टाकणे चांगले: महागड्या शिक्षणासाठी अर्थसाहाय्य करताना पालकांना शैक्षणिक कर्ज (एज्युकेशन लोन) घेण्यापेक्षा बचतीचा वापर करणे जास्त पसंत असते. तथापि, स्वतः वित्त पुरविल्याने बचत निधी संपतो, ज्याची आणीबाणीच्या काळात गरज भासू शकते. जर एखाद्या विद्यार्थ्याने शैक्षणिक कर्जाचा (एज्युकेशन लोनचा) पर्याय निवडला, तर त्याची बचत आणि गुंतवणूक हे त्याच्यासाठी निवारा बनू शकते आणि तो हे आपत्कालीन परिस्थितीत वापरू शकतो.

2. शैक्षणिक कर्जासाठी तारण आवश्यक असते: कर्ज घेताना तारण ऐच्छिक असते. विद्यार्थ्यांना विनातारण कर्ज घेण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. अनेक शिक्षण-केंद्रित वित्तीय संस्था विद्यार्थ्यांना विनातारण कर्ज प्रदान करतात, ज्यात तारणाची गरज भासत नाही. अर्जदारांना त्यांच्या आर्थिक गरजा आणि पसंतीनुसार सुरक्षित आणि असुरक्षित कर्जांमध्ये निर्णय घेता येईल.

3. क्रेडिट इतिहास नसणे म्हणजे कर्ज मंजूरी नसणे: विद्यार्थी सहसा प्रथमच कर्ज घेत असतात, याचा अर्थ असा आहे की एकतर त्यांचा क्रेडिट स्कोअर कमी आहे किंवा त्यांचा क्रेडिट इतिहास नाही. बहुतेक अर्जदारांचा असा विश्वास असतो की क्रेडिट इतिहासाशिवाय, कर्ज मंजूर होत नसते. बऱ्याच वित्तीय संस्थांनी विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन ठेवलेला असतो ज्यात ते विद्यार्थी प्रोफाइलचे मूल्यांकन करून त्याची रोजगार क्षमता निश्चित करतात. शैक्षणिक गुण, प्रवेश परीक्षेचे गुण, विद्यापीठाची वंशावली इत्यादी रोजगारक्षमतेचे मोजमाप करणारे काही महत्त्वाचे घटक असतात. याव्यतिरिक्त, ते कर्ज मंजूरीसाठी सह-कर्जदारांच्या क्रेडिट इतिहासाचे मूल्यांकन सुद्धा करतात.

4. शैक्षणिक कर्जात फक्त शिक्षण शुल्काचा समावेश असतो: बऱ्याच शिक्षण-केंद्रित वित्तव्यवस्था (फायनान्सर) शिक्षण शुल्क, निवास खर्च, अभ्यास साहित्य खर्च, उपकरणांचा खर्च, प्रवास खर्च आणि बरेच काही, यासारख्या शिक्षणाचा समग्र खर्च समाविष्ट असलेले विद्यार्थी कर्ज देतात.

5. पदवीपर्यंत कर्ज नजरेबाहेर आणि मनापासून दूर: कर्ज घेताना अनेकदा शिक्षण पूर्ण होईपर्यंत कर्जाची परतफेड सुरू करण्याची गरज नाही, असे विद्यार्थ्यांना वाटते. ऋण स्थगनचा (मोरेटोरियमचा) कालावधी उपलब्ध असला तरी व्याजमुक्त कालावधी नसल्यामुळे सवलतीच्या कालावधीत साधे व्याज/अंशत: व्याज भरून विद्यार्थी कर्जाच्या परतफेडीसाठी थोडे फार योगदान देण्याचे नियोजन विद्यार्थी वर्गाने केले पाहिजे.

6. शैक्षणिक कर्ज (एज्युकेशन लोन) फक्त उच्च शिक्षणासाठी: करिअरसाठी तयार होता यावे म्हणून अनेक विद्यार्थी मुख्य प्रवाहातील शिक्षणाबरोबरच कौशल्य कार्यक्रमांची (स्किलिंग प्रोग्रामची) निवड करतात. कौशल्य, पुनर्कौशल्य, कौशल्य वाढविणे आणि व्यावसायिक अभ्यास कार्यक्रमांसाठी वित्तीय संस्था विद्यार्थी कर्ज उपलब्ध करून देऊन काळाची गरज भागविण्यासाठी उपाय उपलब्ध करून देत असतात. प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याला शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी काही एन.बी.एफ.सी शालेय शुल्क वित्तपुरवठ्यासारखे उपाय सुद्धा उपलब्ध करून देतात.

7. शैक्षणिक वित्तपुरवठ्यासाठीचे उपाय प्रत्येक विद्यार्थ्याकरिता समान असतात: वित्तव्यवस्था (फायनान्सर) अधिक प्रमाणात व्यक्तीप्रमाणे उपाय देऊ करण्यासाठी विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम, अभ्यासाचे ठिकाण, भविष्यातील करिअरच्या शक्यता, शैक्षणिक गुण, प्रवेश परीक्षेचे गुण आणि इतर गोष्टींवर आधारित त्यांचे प्रोफाइल (त्यांची निवड) करतात. प्रत्येक विद्यार्थ्याची आर्थिक गरज वेगळी असल्याने त्यांच्या पसंतीक्रमानुसार आणि विद्यार्थ्यांच्या प्रोफाइलच्या आधारे शैक्षणिक कर्ज (एज्युकेशन लोन) दिले जाते.

8. शैक्षणिक कर्जासाठी सहकर्जदार लागत नाही: वित्तीय संस्थेने कर्जाचा अर्ज मंजूर करण्यासाठी हमीदार म्हणून काम करण्याकरिता सहकर्जदार खूप गरजेचा असतो. सह-अर्जदार हा पालक, कायदेशीर पालनकर्ता, भावंड किंवा इतर रक्ताचा नातेवाईक असावा.

9. लांबलचक प्रक्रिया: डिजिटलरित्या चपळ प्रक्रियेमुळे, अर्जदारांच्या प्रोफाइलचा आढावा घेऊन नवीन युगातील कर्जदारांना त्वरीत कर्ज वाटप करता येईल. विद्यार्थ्यांनी वित्तव्यवस्थेचे (फायनान्सरचे) निकष पूर्ण केल्यास विद्यापीठाच्या फीची अंतिम मुदत चुकण्याची काळजी त्यांना करावी लागणार नाही.

10. परतफेडीच्या अटी निश्चित आणि कठोर असतात: कर्जाच्या परतफेडीच्या अटी निश्चित करताना शिक्षण-केंद्रित वित्तीय संस्था लवचिकता दर्शवितात. अर्जदार त्यांचे कर्ज कसे फेडतील, त्यांना कोर्स चालू असताना किंवा तो झाल्यावर योगदान देण्यास सुरवात करायची इच्छा आहे का किंवा त्यांना साधे व्याज परत करायचे आहे का, हे समजून घेण्यासाठी त्यापैकी बहुतेक जण अर्जदाराशी अटींवर चर्चा करतात.

अनेक फायदे मिळत असल्यामुळे तरुण उमेदवार विद्यार्थी कर्जाची (स्टुडंट लोनची) निवड करतात. शैक्षणिक कर्जात (एज्युकेशन लोनमध्ये) शिक्षणाचा सर्वांगीण खर्च समाविष्ट केला जातो आणि विद्यार्थ्यांना स्वयंनिर्मित बॅज मिळविण्यास सक्षम केले जाते. शिक्षणकेंद्रित वित्तीय संस्थांकडून विद्यार्थी कर्ज सहज उपलब्ध झाल्याने विद्यार्थी आणि पालक दोघांचाही प्रवास सुरळीत होतो. तथापि, शैक्षणिक कर्जाशी संबंधित महत्वाच्या बाबी समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सखोल संशोधन करणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थी कर्जासंदर्भातील सर्व गैरसमजुती तर दूर होतीलच, शिवाय विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण घेण्यासाठी सर्वोत्तम आर्थिक उपाय निवडता येतील.

- राजेश कचावे
, चीफ बिझनेस ऑफिसर - एज्युकेशन लोन, अवान्स फायनान्शियल सर्व्हिसेस
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.