नवी दिल्ली : पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांची समिती मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करेल, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ही समिती राष्ट्रपतींकडे शिफारस करणार आहे. त्यानूसार निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.