प्रभास आणि दीपिका प्रोजेक्ट के मधून सांगणार विष्णूची नवी गोष्ट

02 Mar 2023 16:38:47
k 
 
मुंबई : अभिनेता अमिताभ बच्चन, दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण येत्या वर्षात एका वेगळ्या चित्रपटातून दिसून येणार आहेत. प्रोजेक्ट के हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. आसवानी दत्त यांनी निर्मिती केलेला नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दीपिका आणि प्रभास एकत्रित मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सायन्स फिक्शन असलेल्या या चित्रपटातून विष्णूची कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
 
विष्णूने नव्या रूपात जन्म घेऊन दुशक्तिंपासून मानवजातीचे संरक्षण करण्याचे मोठे कार्य केले असे या कथानकात दिसून येणार आहे. १२ जानेवारी २०२४ या दिवशी या चित्रपटाचे प्रदर्शन ठरले होते परंतु वेळेच्या आधीच ७० % चित्रीकरण पूर्ण झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच या चित्रपटातून अभिनेत्री दिशा पटणी सुद्धा एक लहानशी ह्यूमिक करत असल्याचे समजले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0