नागालँडमध्ये जिंकून आले आठवलेंचे दोन आमदार!

02 Mar 2023 18:03:05
Two candidates of RPI Athawale faction have won in Nagaland assembly elections


मुंबई
: नागालँड विधानसभा निवडणुकीत टूएनसंद सदर दोन विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार इम्तिचोबा हे विजयी झाले आहेत. तसेच नागालँड च्या नोकसेन विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार वाय. लिमा ओनेन चँग हे विजयी झाले आहेत. नागालँड मध्ये गन्ना किसान (ऊस शेतकरी) या निवडणूक निशाणीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक 8 ठिकाणी लढली आणि त्यात 2 उमेदवार विजयी झाले. अशी माहिती आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. आज दि.2मार्च दुपारी 3 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मुंबई प्रदेश तर्फे नागालँड मध्ये आरपीआय चे दोन उमेदवार विजयी झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय आझाद मैदान मुंबई येथे विजयी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी दिली.


Powered By Sangraha 9.0