‘होळी’साठी वृक्षतोड न करण्याचे पालिकेचे आदेश

02 Mar 2023 16:24:40
Municipality orders not to cut trees for Holi


मुंबई
: “होळी सणाच्या कालावधीत कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करू नये, अन्यथा अनधिकृत वृक्षतोड करणार्‍यांना दंड तसेच कैदेची शिक्षा होऊ शकते,” असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. अनधिकृत वृक्षतोडीसाठी कमीत कमी रुपये एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड तसेच, एक आठवडा ते एक वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते. वृक्षतोड करताना आढळल्यास पालिका विभाग कार्यालयातील उद्यान विभागाच्या अधिकार्‍यांस व स्थानिक पोलीस ठाण्यास कळवावे, असेही आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.


Powered By Sangraha 9.0