पुणे : चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत सुरु असताना भाजपच्या अश्विनी जगताप यांचा विजय झालेला आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. नवव्या फेरीअखेर जगताप 6356 मतांनी आघाडीवर होत्या. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे दुसऱ्या, अपक्ष राहुल कलाटे तिसऱ्या स्थानावर होते.
पंधराव्या फेरीत अश्विनी जगताप ३६७७, नाना काटे २८९१, राहुल कलाटे १८९७ मते होती. तर, एकूण १६ फेर्या मिळून अश्विनी जगताप यांचाकडे ९०९९ मतांची आघाडी होती.