मविआत जाण्याची चूक उद्धव ठाकरेंनी मोदींसमोर मान्य केली होती

19 Mar 2023 17:43:38
uddhav-thackeray-admitted-to-narendra-modi-the-mistake-of-going-to-mahavikas-aghadi-secret-explosion-of-deepak-kesarkar
 
मुंबई : “तुम्ही स्वतः पंतप्रधान महोदयांच्या समोर कबूल केलं होतं की, काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जाण्याची तुमच्याकडून चूक झाली, हिंदुत्वाचा विचार सोडण्यात तुमची चूक झालेली आहे,” शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाना साधला आहे. मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जनतेला वस्तुस्थिती सांगा, असे आवाहनही केले आहे.

"
माध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले, “आम्ही उद्धव ठाकरेंना पुन्हा पुन्हा सांगितलं, आजसुद्धा तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तोडा, आम्ही सर्व जण तुमच्याबरोबर आहोत. त्यामुळे कोणीही तुम्हाला फसवलेले नाही. उलट तुम्ही स्वतःहून सांगितलं की, तुम्ही सगळे जण निघून जा आणि आता जनतेला उलटं सांगताय हे चुकीचे आहे. जनतेला वस्तुस्थिती सांगा,” असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतील खेड येथे होत असलेल्या सभेपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

दिपक केसरकर यांची टोलेबाजी


कोणाला खोके खोके म्हणता, खोक्याबरोबर खेळायची आदित्य ठाकरेंना लहानपणापासून सवय असेल. आम्हाला खोक्याबरोबर खेळायची सवय नाही. आम्ही जनतेबरोबर राहिलो म्हणून आमदार झालो. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून आम्ही आमदार झालो दिल्लीत मोदींना भेटल्यानंतर मी हे दुरुस्त करेन, असं आश्वासन देऊन तुम्ही इथे आलात. परंतु तुम्ही तो शब्द मोडला कोणी कोणाला फसवलं हे महाराष्ट्राच्या जनतेलासुद्धा समजलं पाहिजेकाँग्रेस आणि राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंना फसवलेलं आहे
 
ठाकरेंनी कोकणाकडे दुर्लक्ष केले


उद्धव ठाकरेंनी कोकणी माणसाकडे दुर्लक्ष केले. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी खेडमध्ये सभा घेतली. त्यांनी आमच्यावर वाट्टेल ते आरोप केले. मात्र, मी कुणाबद्दल वाईट बोलणार नाही. तरीही कोकणातील जनतेने वस्तुस्थितीची खात्री केलीच पाहीजे. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेले, असा आरोप दिपक केसरकर यांनी केला आहे.

 
Powered By Sangraha 9.0