नववर्ष पूर्व संध्या - दीपोत्सव व सामाजिक दायित्वाचे स्मरण

19 Mar 2023 15:49:00
hindu New Year

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला आता ओढ लागली आहे गुढीपाडव्याच्या आनंदोत्सवाची, शोभायात्रांची. भारतीय नव वर्षाचे स्वागत पारंपरिक पद्धतीने, सांस्कृतिक वारसा जपत ढोल ताशांच्या गजरात अतिशय उत्साहात सर्वत्र केले जाते. या अनुषंगाने विविध सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम तसेच समाजउपयोगी उपक्रम विविध संस्था हाती घेत आहेत.


मुंबईतील दहिसर या उपनगरात जितक्या उत्साहाने दहिसरच्या शोभायात्रेचे आयोजन केले जाते तितक्याच उत्साहाने नव वर्ष पूर्व संध्येला विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

या वर्षी नववर्ष पूर्व संध्येला म्हणजेच मंगळवार दिनांक 21 मार्च रात्री 8 वाजता दहिसर नदीच्या काठी श्री विठ्ठल रुक्मिणी च्या भव्य प्रतिमा उभारून दश सहस्त्र दिव्यांनी नदीचा काठ उजळून निघणार आहे. नागरिक हा दीपोत्सव साजरा करत असताना सामाजिक संकल्पाचे दीप प्रज्वलित करणार आहेत.विठुमाऊलीची महाआरती व दक्षिण भारतातील प्रसिद्ध चेंडा मेलाम वादन असे कार्यक्रम होणार आहेत.
Powered By Sangraha 9.0