समाजमाध्यमावर औरंगजेबाचे उदात्तीकरण

17 Mar 2023 15:11:35
offensive-text-and-photograph-about-chhatrapati-shivaji-maharaj-on-social-media


ठाणे : ‘इन्स्टाग्राम’ या समाजमाध्यमावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्र प्रसारित होत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या नंदुरबार जिल्हा संपर्क संघटक पर्णिता पोंक्षे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘इन्स्टाग्राम’ या अ‍ॅपवर ‘तैमुर अकबर औरंगजेब’ या नावाने एक खाते आहे. या खात्यावर छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र प्रसारित केले जात आहेत. तसेच, औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. शिवसेनेच्या नंदुरबार जिल्हा संपर्क संघटक पर्णिता पोंक्षे यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Powered By Sangraha 9.0