अभद्र क्षणांची 'मूक' साक्षीदार! - मी वस्त्रवती

17 Mar 2023 14:48:32

vastravati 
 
 
मुंबई : 'मी वस्त्रवती' या नाटकाचा प्रयोग दि. २५ मार्च रोजी पुण्यात होत आहे. पुण्यातील जोत्स्ना भोळे सभागृह येथे, हिराबाग चौकाजवळ महाराष्ट्र कल्चरल सेंटर येथे होत आहे. 'निर्माण कला निर्मिती संस्थे'च्या या नाटकाचे एकूण ५ प्रयोग झाले आहेत. दर प्रयोगानंतर या कलाकृतीत बदल घडत गेले आहेत.  एकूण १४ कलाकारांच्या या नाटकात नृत्य व नाट्य यांचा सुरेख मेळ पाहायला मिळतो. या नाट्यकृतींतून वस्त्र व तत्कालीन काळाचा संगम घालण्याचा प्रयत्न केला आहे. पौराणिक कथांमधील काही स्त्रिया म्हणजेच 'नायिका', त्यांची व्यक्ती स्वरूप वस्त्रे आणि सध्याच्या काळातील संदर्भ असे या नाट्याचे स्वरूप आहे. महत्वाची बाब म्हणजे नाटकाला कथानक नाही. या नाट्यात, जानकी, अहिल्या, द्रौपदी, शूर्पणखा आणि वेदवती अशा पाच नायिकांची वस्त्रे त्यांची कथा सांगतात. त्याचे संदर्भ आजच्या काळाशीही कसे सुसंगत आहेत हे दाखवायचा प्रयत्न या नाट्यातून केला आहे. या संपूर्ण नाट्याचे संगीत अमन वर्खेडकर आणि मंगेश जोशी यांचे आहे. लेखन, दिग्दर्शन व नृत्य संरचना मयूर शितोळे यांनी केली आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0