नाशिक : ‘इंडिगो’ विमान सेवेने ७७ वे देशांतर्गत आणि एकूण १०३ वे गंतव्य असलेल्या नाशिकमधून डायरेक्ट फ्लाइट्सचा शुभारंभ बुधवारी केला. ‘एअरलाइन’ने नाशिक-गोवा, नाशिक-अहमदाबाद आणि नाशिक-नागपूर दरम्यान पहिली डायरेक्ट उड्डाणे सेवेत रूजू केले. या नवीन ‘हवाई सेवेने’ व्यापार, पर्यटन व गतिशीलतेला चालना देताना राज्यांतर्गत आणि आंतरराज्य सुलभता वाढणार आहे. याप्रसंगी बोलताना ‘इंडिगो’चे विनय मल्होत्रा म्हणाले, ”नाशिकमधून आमच्या सेवा शुभारंभाची घोषणा करताना आनंद होत आहे. समृद्ध आध्यात्मिक आणि पौराणिक वारसा असलेल्या नाशिककरिता सेवा वाढवत या प्रांतातील व्यापार व पर्यटनाला चालना देण्याचा, तसेच आर्थिक विकासालादेखील चालना देण्याचा आमचा मानस आहे.”