अग्निवीरांना आता CISF भरतीसाठी १० टक्के आरक्षण

17 Mar 2023 14:09:27

CISF


नवी दिल्ली (Agniveer CISF भर्ती ) 
: बीएसएफने अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतर आता सीआयएसएफतर्फे (CISF ) अग्निवीरांना आणखी १० टक्के आरक्षण दिले जाणरा आहे. सीआयएसएफद्वारे आयोजित भरती प्रक्रीयेतही अग्निवीरांच्या कलाम वयोमर्यादेतही सुट मिळणार आहे. अर्जदाराच्या बॅचनुसार ही सवलत जाहीर केली जाणार असल्याची प्रार्थमिक माहिती आहे. यापूर्वी गृह मंत्रालयाने माजी अग्निशमन दलाच्या जवानांसाठी बीएसएफच्या भरतीसाठीही अशीच घोषणा केली होती.

भारतीय सैन्याने अग्निवीर भरतीची अर्ज प्रक्रीया सुरू केली आहे. याद्वारे उमेदवार २० मार्च २०२३ पर्यंत joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. पहिल्या अर्जाची अंतिम तारीख १५ मार्च होती त्यात आणखी पाच दिवसांची म्हणजेच २० मार्च पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. अग्निवीर अंतर्गत, भारतीय लष्करातर्फे स्टोअर कीपर, लिपिक आणि तांत्रिक यासह विविध पदांसाठी भरती प्रक्रीया करणार आहे.




गतवर्षी केंद्र सरकारने 'अग्निपथ' योजना सुरू केली. या योजनेंतर्गत निवड झालेल्या तरुणांना 'अग्निवीर' म्हणून संबोधले जाते. या तरुणांना चार वर्षांसाठी नोकरी दिली जाणार आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या तरुणांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, केंद्र सरकारने कार्यकाळ पूर्ण केलेल्या अग्निवीरांना संरक्षण दलात सहभागी करून घेण्याची तरतूद केली होती. ही तरतूद २५ टक्के इतकी होती. उर्वरित ७५ टक्के अग्निवीरांचा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, त्यानंतर केंद्रीय निमलष्करी दल आणि आसाम रायफल्समधील १० टक्के रिक्त जागा अग्निवीरांसाठी राखीव ठेवल्या जातील, अशी घोषणा करण्यात आली होती.
 


Powered By Sangraha 9.0