जलद आर्थिक व्यवहारांसाठी ‘पेटीएम’चे ‘युपीआय लाईट'

    17-Mar-2023
Total Views |
UPI Lite

मुंबई : ‘पेटीएम’ने नुकत्याच आपल्या ‘युपीआय लाईट’ सेवेचा शुभारंभ केला आहे. ही सेवा वापरकर्त्यांना एकाच क्लिकमध्ये ‘पेमेंट्स’ करण्याची सुविधा देते.
 
भारतातील स्वदेशी ’पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड’ (पीपीबीएल)देखील ‘युपीआय लाईट’सह कार्यरत झाली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना कधीच अयशस्वी न होणार्‍या अत्यंत गतिशील ‘युपीआय’ पेमेंट्सची सुविधा मिळाली आहे. वापरकर्ते विनासायास व्यवहारांसाठी त्यांच्या ‘पेटीएम पेमेंट्स बँक’ बचत खात्यांशी लिंक केलेले त्यांचे ‘युपीआय लाईट अकाऊंट्स’ कार्यान्वित करू शकतात. वापरकर्ते एकाच क्लिकसह जवळपास २०० रूपयांपर्यंत जलद व एकसंधी ‘पेमेंट्स’ करू शकतात.

‘पेटीएम पेमेंट्स’ बँकेने आज ‘पेटीएम युपीआय लाईट’वर दोन दशलक्षांहून अधिक वापरकर्ते असण्याची घोषणाकेली आहे. बँकेने ’पेटीएम अ‍ॅप’च्या माध्यमातून ‘पेटीएम युपीआय लाईट’साठी अर्ध दशलक्षांहून अधिक दैनंदिन व्यवहारांची नोंद केली आहे. यामधून या सेवेची वाढती लोकप्रियता दिसून येते.
 
‘पेटीएम युपीआय लाईट सिंगल-क्लिक पेमेंट्स’ सुविधा देते, जी कधीच अयशस्वी होत नाही. कार्यान्वित झाल्यानंतर ‘युपीआय लाईट’ जवळपास २०० रुपयांपर्यंतचे त्वरित व्यवहार करण्याची सुविधा देते. दिवसातून दोनदा अधिकतम दोन हजार रूपये ‘युपीआय लाईट’मध्ये भरता येऊ शकतात, ज्यामुळे दररोज एकूण चार हजार रूपयांपर्यंत मूल्याचा वापर करता येऊ शकतो.

‘पेटीएम युपीआय’ यशस्वी पेमेंट्ससाठी आधुनिक ‘युपीआय लाईट’ तंत्रज्ञानाद्वारे समर्थित आहे आणि त्रिस्तरीय बँक-ग्रेड सुरक्षितता देते. तसेच ‘युपीआय लाईट’चा वापर करत केलेले पेमेंट्स पासबुकमध्ये दिसणार नाहीत, ज्यामुळे वापरकर्त्याला ‘अनक्लटर्ड बँक स्टेटमेंट’ मिळते. ‘युपीआय लाईट’ बॅलन्समध्ये पैसे भरताना फक्त एकाच एंट्रीची नोंद होते.
 
‘पेटीएम’ बँक ‘युपीआय’मधील सर्वात मोठी संपादनकर्ता व लाभदायी बँक म्हणून पहिल्या क्रमांकाची बँक असण्यासोबत आघाडीची ‘रेमीटर बँक’देखील आहे. ‘युपीआय लाईट’ लॉन्च करणारी पहिली ‘पेमेंट्स बँक’ म्हणून बँकेने आपल्या वापरकर्त्यांसाठी तंत्रज्ञानकेंद्री नवोन्मेष्कारी सोल्युशन्स निर्माण करण्याची परंपरा कायम ठेवली आहे आणि दैनंदिन व्यवहारांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे.

 
‘पेटीएम युपीआय लाईट’ कशाप्रकारे ’सेट अप’ करावे?

१. ’पेटीएम’ अ‍ॅप सुरू करा आणि ‘युपीआय लाईट’वर क्लिक करा.

२. ‘युपीआय लाईट’साठी पात्र असलेला ‘बँक अकाऊंट’ निवडा आणि ‘प्रोसिड’वर टॅप करा.

३. ‘अ‍ॅड मनी टू अ‍ॅक्टिव्हेट युपीआय लाइट’ पेजवर ‘युपीआय लाईट’मध्ये भरावयाची रक्कम प्रविष्ट करा.

४. हे केल्यानंतर वापरकर्ते ‘पेटीएम युपीआय लाईट’चा वापर करण्यास सुरूवात करू शकतात.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.