दहावी बोर्डाचा निकाल लांबणार! विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात!

    17-Mar-2023
Total Views |

Old Pension Scheme (1)



छत्रपती संभाजी नगर ( Old Pension Scheme ) :
राज्यातील दहावी बोर्डाच्या (X Board) परीक्षांचे निकाल लांबणीवर जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. निकाल उशीरा लागल्याने महाविद्यालयीन प्रवेश परीक्षाही रखडण्याची चिन्हे आहेत. जुन्या पेन्शन योजना पूर्नजीवित व्हावी यासाठी राज्यभरातील सरकारी कर्मचारी संप आणि आंदोलनात सहभागी झाले आहेत. यातील सामील शिक्षकांनी दहावी बोर्डाचे पेपर तपासून देण्यास नकार दिल्याने गठ्ठेच्या गठ्ठे तसेत पडून आहेत. संपकरी शिक्षकांनी उत्तर पत्रिका तपासून देण्यास नकार दिल्याने हा पेच निर्माण झाला आहे.
 
छत्रपती संभाजी नगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) केंद्रात गठ्ठेच्या गठ्ठे बोर्डाकडे जमा होत आहेत. तसेच शिक्षकांकडे तपासणीसाठी दिले जात आहेत, त्यातील ३० टक्के गठ्ठे परत केले जात आहेत. उर्वरित ७० टक्के उत्तरपत्रिका अपेक्षित वेळेत तपासून पुढे पाठविले जात नाहीत, असे बोर्डातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य सरकारी  शिक्षक कर्मचारी जे संपात सहभागी आहेत. तसेच अनुदानित तत्वावर चालविल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये जे शिक्षक आहेत. तेही या  Old Pension Scheme  संपात सहभागी झाले आहेत. निकालावर परिणाम होणार नाही यासाठी बोर्डातर्फे उपाययोजना केल्या जाणार आहेत.
 
जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन
 
'एकच मिशन जुनी पेन्शन', ( Old Pension Scheme ) अशी घोषणा देत राज्यभरातील शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. १४ मार्चपासून सुरू असलेल्या या संपाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्याने सरकारी कार्यालयातील कामकाज प्रलंबित आहे. विशेष म्हणजे यात आरोग्य कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. आरोग्य कर्मचारी संपात सामील झाल्याने तब्बल ४० मृत्यू झालाचा दावा राज्य सरकारतर्फे एका आकडेवारीत करण्यात आला आहे.
 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.