अमरावतीत वस्त्रोद्योग पार्क उभारणार, ३ लाख रोजगार मिळणार

महाराष्ट्राला मोदींचं गिफ्ट!, देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार

    17-Mar-2023
Total Views |
3 lakh jobs will be available in Maharashtra

 
मुंबई : पीएम मित्रा योजनेअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या सात मेगा इंटीग्रेट टेक्स्टाईलपैकी एक पार्क महाराष्ट्रात अमरावतीत होणार आहे. यामुळे तब्बल १० हजार कोटींची गुतवणूक येणार असून एकूण तीन लाख रोजगारनिर्मिती शक्य असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते म्हणाले, "आमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांप्रति आमची ही वचनबद्धता आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात पीएम मित्रा अंतर्गत पीएम मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क (वस्त्रोद्योग पार्क) मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अत्यंत मनापासून आभारी आहे."

"देशात एकूण 7 वस्त्रोद्योग पार्क मंजूर करण्यात आले असून त्यापैकी एक महाराष्ट्रात मिळाला आहे. या प्रत्येक मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क (वस्त्रोद्योग पार्क) माध्यमातून ₹10,000 कोटींची गुंतवणूक तसेच 1 लाख प्रत्यक्ष तर 2 लाख अप्रत्यक्ष असे 3 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. विदर्भ विशेषतः पश्चिम विदर्भाच्या विकासाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.", असेही ते म्हणाले.