शिवसेना कोणाची? निकाल लागला?

16 Mar 2023 16:38:28
shiv-sena-name-symbol-controversy

नवी दिल्ली : राज्यात झालेल्या सत्तासंघर्षाचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टात दाखल असून यावर शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही बाजुंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. यानंतर आता कोर्ट काय निकाल देणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सुप्रिम कोर्टात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा आज तिसरा दिवस होता.मात्र घटनापिठाने सर्व बाजूचा युक्तिवाद ऐकून निकाल राखून ठेवला आहे. हा सत्तासंघर्षाचा युक्तिवाद ९ महिन्यानंतर संपलेला आहे.

आज युक्तिवादादरम्यान न्यायालयाने युक्तिवाद लवकर संपवा, अन्यथा निकालाला वेळ लागले, असे ही म्हणटले होते. तसेच सिंघवी यांनी विधीमंडळ पक्ष कायमस्वरूपी नसतो तर राजकीय पक्ष असतो, असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला. कोर्टाकडून राज्यपालांच्या भूमिकेवरही यावेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले. नंतर घटनापिठाने सत्तासंघर्षावरचा सर्व बाजूचा युक्तिवाद ऐकून निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे.
 
Powered By Sangraha 9.0