उद्या साहित्य अकादमीत कथासंधीचे आयोजन

16 Mar 2023 18:18:23
sahitya 
 
मुंबई : साहित्य क्षेत्रातील सर्वात नावाजलेली संस्था म्हणजे साहित्य अकादमी. साहित्य अकादमीच्या मुंबई विभागात नेहमीच अनेक उत्तम कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दि. 17 मार्च रोजी शुक्रवारी 'कथासंधी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रम दुपारी ठीक ४ वाजता साहित्य अकादमीच्या मुंबईतील दादर येथी कार्यालयाजवळ ऑडिटोरियममध्ये होणार आहे. साहित्यिक विवेक कुडू विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 
यावेळी, विवेक कुडू आपल्या कथांचे वाचन करतील. काही निवडक कथा वाचनानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यालय प्रभारी डॉ. ओम प्रकाश नगर यांनी केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0