सदानंद कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

    16-Mar-2023
Total Views |
sadanand-kadam-judicial-custody-update

मुंबई : साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांची ईडी कोठडी आज संपली. यानंततर ईडीने वाढवून मागितलेला कोठडीची मागणी न्यायालयाने फेटळून लावली. यानंतर सदानंद कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात अटकेत असणारे जयराम देशपांडे व कदम यांची समोरासोर चौकशी करण्यासाठी ईडीने सदानंद कदम यांची ईडी कोठडी वाढवून मागीतली मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली व त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.