पंतप्रधान मोदी शांततेच्या नोबेलचे सर्वात मोठे दावेदार

16 Mar 2023 18:50:51
pm-modi-biggest-contender-for-nobel-peace-prize-india
 
 
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगात तणावाची स्थिती निर्माण झाली असून हे युध्द थांबवण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे नोबेल पारितोषिक समितीने कौतुक केले आहे. नोबेल समितीचे उपनेते असल तोजे म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना युद्ध रोखण्याबाबत समजावून सांगितले ते कौतुकास्पद आहे. त्यांनी कोणतीही धमकी न देता आण्विक युद्धाच्या परिणामांबद्दल कठोर संदेश दिला, आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्याला अशा नेत्यांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

’मोदी अत्यंत विश्वासू नेते’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना समितीचे उपनेते तोजे म्हणाले, भारतीय पंतप्रधान नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार असू शकतात. मोदी हे अत्यंत विश्वासू नेते आहेत, जे शांतता प्रस्थापित करू शकतात. मोदी हे जगातील मोठ्या राजकारण्यांपैकी एक आहेत आणि ते शांततेसाठी मोठे योगदान देत आहेत. ’हे युद्धाचे युग नाही’ असे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना सांगितल्याबद्दल असल तोजे यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.

’भारताला शांततेचा वारसा’

नोबेल समितीच्या नेत्याने भारताला विकसित देश बनवण्यात पंतप्रधान मोदींच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले. भारत हा शांततेचा वारसा असलेला देश आहे असे सांगून असल तोजे म्हणाले की, भारत महासत्ता बनणार आहे. याशिवाय ते म्हणाले की पंतप्रधान मोदी हे युद्ध थांबवणारे सर्वात विश्वासू नेते आहेत आणि ते जगात नक्कीच शांतता प्रस्थापित करू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
 
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना तोजे म्हणाले की, मोदी हे केवळ भारताला पुढे नेण्याचे काम करत नाहीत, तर जगातील शांततेसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवरही ते काम करत आहेत. त्यांच्याकडून इतरांनी शिकण्याची गरज आहे.असल तोजे हे नॉर्वेजियन नोबेल समितीचे डेप्युटी लीडर आहेत. ते परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक असून, २००९ पासून ते नोबेल शांतता पुरस्कार समितीमध्ये सक्रिय आहेत. गेल्या काही वर्षांत तोजे यांनी आपला बहुतेक वेळ आण्विक निःशस्त्रीकरण, शांतता आणि जिओपॉलिटिक्स या विषयांवर घालवला आहे


Powered By Sangraha 9.0