"हिंदू वस्तीत अत्याचार!, लव्ह जिहाद, लॅण्ड जिहादला फंडींग" गृहमंत्र्यांचे कारवाईचे निर्देश

लव्ह जिहाद, लॅण्ड जिहादला फंडींग झाल्याचाही आरोप, तपास होणार

    16-Mar-2023
Total Views |

Nitesh Rane Devendra Fadnavis 
 Nitesh Rane and Devendra Fadnavis 
 
मुंबई : अहमद नगर जिल्ह्यातील हिंदू वस्तीला सातत्याने टार्गेट करणाऱ्या अफझल शेख (Afzal Shaikh) याचा लव्ह जिहाद (Love Jihad) आणि लॅण्ड जिहाद (Land Jihad) फंडींगमध्ये हस्तक्षेप आहे. तसेच तिथल्या हिंदू वस्तीतील तरुणांवर अन्याय अत्याचाराचे प्रकार होत असून महिलांवरील विनयभंगाचेही प्रकार होत आहेत, या प्रकरणात तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील चौकशी करून पुढील कारवाई करणार असे निर्देश यावेळी दिले.
 
लक्षवेधी चार मांडताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, "अफझल शेख (Afzal Shaikh) नावाचा रामवाडीतील घटनेला कारणीभूत आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर झाल्यावर एका हिंदू व्यक्तीने त्याचे स्टेटस ठेवले होते. त्यावेळी तिथे एका जमावातर्फे हिंदुत्वावादी विचारांच्या लोकांना टार्गेट करण्यात आले. रॉडने मारहाण करण्यात आले. तसा स्टेट्स ठेवणाऱ्या हिंदु वस्तीत जाऊन महिलांचाही विनयभंग केला. सातत्याने या भागात रहाणाऱ्या हिंदू वस्तीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.", अशी माहिती त्यांनी दिली.
 
रामवाडी नगराचे (Ramwadi Nagar) नाव हिमायत नगर (Himayat Nagar) ठेवण्याचा आग्रह विशिष्ट वस्तीतील जमावाकडून केला जातो. यासाठी तेथील मंदिरातील मुर्त्यांची विटंबना करण्यात आली. मंदिराची तोडफोड करण्यात आली. मात्र, असे काही झालेच नाही, हे दाखविण्याच प्रयत्न पोलीसांमार्फत (Nagar Police) झाला. अफझल शेख आणि त्याच्या समर्थकांच्या घरात पाकिस्तानी चॅनल्स सुरू असतात. त्यांच्या वाहनांचे क्रमांकही २६-११ ला अनुसरुन २६-१२. असा ठेवण्यात आले. हिंदू वस्तीतील झालेल्या या अत्याचाराविरोधात हिम्मत करून तरुणांनी एफआयआर दाखल केली.
  
मात्र, त्याला जामीन मिळावा यासाठी पुरेपूर वेळ देण्यात आली. तसेच त्याच्या समर्थकांना पोलीस संरक्षणही देण्यात आली. पोलीस ठाण्याची तोडफोड केल्याचा आरोपही अफझल शेखवर (Afzal Shaikh) आहे. त्याच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे. या प्रकरणात पोलीसांनी खटला दाखल करताना बहुसंख्य हिंदू वस्तीतील मुलांवरही गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केली. या प्रकरणातील एसपी आणि पीआयची चौकशी करणार का, असा सवालही नितेश राणेंनी ( Nitesh Rane ) विचारला.
 
या प्रकरणानंतर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी लक्षवेधीवर आक्षेप घेतला. ते म्हणाले, "लक्षवेधीचे स्वरुप सामाजित तेढ निर्माण करणारे आहे. गुन्हा करणारा कुणी आहे, त्याच्या धर्माचा विचार करता कामा नये. गुन्ह्याचे स्वरुप कुठलेही असेल. मात्र, त्याला असे सामाजिक तेढ निर्माण होईल, असे ड्राफ्टिंग देऊ नये, " अशी मागणी थोरात यांनी केली.
 
 
यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  म्हणाले की, "नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी मांडलेल्या लक्षवेधी ही केवळ अर्ध्या पानाची आहे. काही लक्षवेधी ह्या दीड दीड पानाच्या असतात.", असे उत्तर बाळासाहेब थोरात यांना दिले. "नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मांडलेली परिस्थिती वस्तुस्थिती आहे. त्यामुळे प्रकरण नाकारता येत नाही. शाब्दिक चकमक ही संभाजी नगर, असा स्टेटस का ठेवला, असा जाब विचारला, असेच आरोपीने विचारले आहे. इतकी गंभीर कलमे असताना ३०७ नंतरही त्याला अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला.तसा जामीन केवळ सर्वोच्च न्यायालय देऊ शकतो. या प्रकरणाची कायदेशीर बाबही तपासली जाईल. या संदर्भात स्थानिक पोलीसांचा हस्तक्षेप झाला तर त्यावरही कारवाई केली जाईल.", असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.


छत्रपती संभाजी नगरचा स्टेटस ठेवतो काय? 

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादचे नामांतरण छत्रपती संभाजी नगर झाल्यानंतर अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी स्टेट्स ठेवला होता. त्यातील एका हिंदू कार्यकर्त्याला काही कट्टरपंथींनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्या घरच्यांनाही मारहाण केली. तसेच घरातील महिलांचा विनयभंग केला. पोलीसांना परस्पर विरोधी गुन्हे दाखल करत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.