न्यूझीलंडमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप

    16-Mar-2023
Total Views |
new-zealand-earthquake-7-1-magnitude-struck-depth-of-10-kilometers

वेलिंग्टन
: न्यूझीलंडच्या कर्माडेक बेटावर गुरुवारी सकाळी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे नुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.१ होती. भूकंपानंतर न्यूझीलंडमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.


भूकंपप्रवण क्षेत्रात येतो न्यूझीलंड
 
न्यूझीलंडचा परिसर भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. न्यूझीलंडमध्ये दरवर्षी भूकंप होतात. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे तो भूकंपीय क्रियाकलापांच्या क्षेत्राच्या काठावर वसलेला आहे, ज्याला रिंग ऑफ फायर म्हणतात. आज सकाळी झालेल्या भूकंपामुळे किती नुकसान झालं हे अद्याप समजू शकलेलं नाही.

भूकंपानंतर न्यूझीलंडमध्ये त्सुनामीचा इशारा

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, या भूकंपाची तीव्रता ७.१ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १० किलोमीटर आत होता. भूकंपानंतर न्यूझीलंडमध्ये त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे.

USGS च्या निवेदनानुसार, गुरुवारी (१६ मार्च) सकाळी न्यूझीलंडच्या उत्तरेकडील कर्माडेक बेटांवर ७.१ तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंप १० किमी खोलीवर होता. भूकंप समुद्रात झाला असल्याने भूकंपाच्या केंद्रापासून ३०० किलोमीटरच्या त्रिज्येत त्सुनामी येऊ शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तशा इशाराही न्यूझीलंड प्रशासनाने दिला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.