सोने-चांदीची चमक झाली स्वस्त

फ्युचर्स मार्केटमध्ये लक्षणीय घट

    16-Mar-2023
Total Views |
gold-silver rates
 
 
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने घट होत आहे. विशेष म्हणजे जे लोक फ्युचर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यांना याचा फायदा होत आहे. गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या दरात साडेतीनशे रुपयांची घट नोंदविली गेली. त्यामुळे २४ कॅरेट सोने ३४३ रुपयांच्या घसरणीसह ५७,९५५ रुपये प्रति १० ग्रॅम इतके झाले.
 
एक दिवस आधी म्हणजे बुधवारी वायदा बाजारात सोने ५८,३३८ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते. सोने ५८,८४७ रुपयांच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च किंमतीपेक्षा १,००० रुपयांनी स्वस्त आहे. त्याच वेळी, आज सोन्यामध्ये आणखी घसरण नोंदवली गेली असून, सोने ५७,९२५ रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली आले आहे.
 
चांदीच्या दरातही घसरण
 
वायदे बाजारातही चांदीच्या किंमतीवरही गुरुवारी दबाव दिसून आला असून मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीच्या दरात ०.६५ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली असून चांदी ६७,०८० रुपये प्रति किलोवर व्यवहार झाला. त्यात दिवसभरात घसरण होत गेल्याने चांदीचा प्रति किलो वर व्यवहार ६६,९२६ रुपये इतका झाला.
 
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत ०.३ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली असून, ते १,९१२.४८ डॉलर प्रति औंसवर व्यवहार होत आहे. दुसरीकडे, चांदीमध्येही घसरण नोंदवली जात आहे. चांदी ०.४ टक्क्यांनी घसरून २१.७१ डॉलर प्रति औंसवर व्यवहार होत आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत सोने-चांदीच्या दरात नोंदला जात असून फ्युचर मार्केटमधील गुंंतवणूकदारांना ही पर्वणी ठरत आहे.
 
प्रमुख शहरांमधील सोने (प्रति तोळा)-चांदीचे दर
 
दिल्ली - २२ कॅरेट सोने ५३,२०० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ६९,००० रुपये प्रति किलो

मुंबई- २२ कॅरेट सोने ५३,०५० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ६९,००० रुपये प्रति किलो

कोलकाता- २२ कॅरेट सोने ५३,०५० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ६९,००० रुपये प्रति किलो
 
चेन्नई- २२ कॅरेट सोने ५३,८०० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ७२,५०० रुपये प्रति किलो
 


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.